पुणे,दि.२२-: पुणे विभागातील पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना जिल्हातील सर्व मतदान केंद्रावर येत्या दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.
तसेच सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांना त्यांचे मतदान केद्रांवरील सहाय्यक( BLA) यांना आपले मतदान केंद्रावर उपस्थित राहून सर्व पात्र मतदारांची नोंदणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शिवाय सर्व मतदान केंद्रावर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .त्याचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव असल्याची सर्व नागरिकांनी खात्री करून घ्यावी व गरजेनुसार नाव नोंदणीसाठी फॉर्म ६,,नाव वगळण्यासाठी फॉर्म ७,मतदार यादीतील नावात व तपशीलात दुरुस्ती साठी फॉर्म ८ व स्थानांतरासाठी फॉर्म ८अ मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेले आहेत ते भरुन द्यावेत.
मतदानाचा हक्क बजावताना मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी उपयोगी आहे. मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ला मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी, या संधीचा सर्व पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.