पुणे,दि.२८:- पुणे शहरातील चतुःश्रृंगी मंदिरा च्या जवळ वस्ती वडारवाडी , परिसरात असलेल्या एका घरात व दुकानात सुगंधीत तंबाखु जन्य पदार्थ पान मसाला, गुटखा व विदेशी दारु साठा पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पाेलिसांनी छापा मारला असून, २ लाख ७२ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत १ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पुणे शहरात सुगंधीत तंबाखु जन्य पदार्थ पान मसाला, गुटखा व विदेशी दारु विक्री करणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश व अवैध धंदे वर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पोलिस पथकाने चतुःश्रृंगी मंदिराच्या जवळ वस्ती वडारवाडी परिसरात असलेल्या गुटखा व विदेशी दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर बुधवार दि.०१ रोजी छापा मारला. दरम्यान, पथकाने गुटखा २ लाख १२ हजार १०४/- रू. किचा व विदेशी दारू २७ हजार ६५०/- रु किची तसेच ३२ हजार ४६०/- रूपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ७२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाेलिस पथकाने सदरबाबत १ आरोपी विरूध्द चतुःश्रृंगी पो स्टे गुरनं. १८६ / २०२३ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २०(२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ व महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.