पुणे,दि.१६: -खुण्याच्या गुन्ह्यातील ११ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खडकी पोलीसांणी केले जेरबंद याबाबत खडकी पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे या ठिकाणी दि.०३/०९/२०१२ रोजी दाखल आरोपी नामे, उमेश गोरख सावंत, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे. यांनी मारहान करून गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होते. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.या गुन्ह्यातील तपास पोलीसांनी चालु केला असताना संशयित आरोपी उमेश गोरख सावंत, हा गुन्हा घडल्यापासुन रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे परीसरातुन ११ वर्षांपासून गायब झाला होता.व त्याच्या घरी दहा ते बारा वेळा पोलीसांणी जाऊन तपास केला असता तो मिळत नव्हता. दरम्यान संशयित आरोपी हा वाघोली, पुणे या ठिकाणी लपून रहात असल्याची माहीती खब-यांकडुन मिळाल्यानंतर पोलीसांणी वेषांतर करून जवळपास चार दिवस या ठिकाणी शोध घेतला असता आरोपी वाघोली थांबले असता रात्री २१ / ३० वा. सुमारास बातमीप्रमाणे वर्णनाचा अंगात गुलाबी रंगाचा हाफ बाह्याचा शर्ट घातलेला व निळ्या रंगाची मंकी वॉश फाटलेली डिझाईनची जिन्स घातलेली तसेच चेह-यावर दाढी वाढलेली त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असुन या आरोपीस पोलीसांणी अटक केली आहे.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयानी त्यास दि. १६/०२ / २०२३ रोजी पर्यंत ०४ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, तपासपथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, सपोफौ तानाजी कांबळे, पो.ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.शि. पठाण यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वैभव मगदुम, पोलीस उप निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.