पुणे,दि.११:- पुण्यातील बाणेर रोड सिंध सोसायटीत येथील राहत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून परदेशी बनावटीचे १ पिस्तूल, १२ काडतुसे, रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ०६ लाख १ हजार २०० रूपयांच मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार दि१० रोजी रात्री २ ते पहाटे ५ दरम्यान बाणेर रोडवरील सिंध सोसायटीत उघडकीस आला आहे.
जगदीश कदम हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.
त्यांच्याकडे इटालियन बनावटीचे पिस्तूल आहे.
चोरट्यांनी कदम यांच्या घरात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे कुटुंबीय झोपले होते.
चोरट्यांनी बेडरुममधील कपाट उचकटून दोन लाखाची रोकड, दागिने, इटालियन बनावटीचे पिस्तूल,
आठ काडतुसे असा एकूण ०६ लाख १ हजार २०० रूपयांच मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पो.निरी.(गुन्हे) अंकुश चिंतामणी करीत आहेत.