पुणे,दि.०३:- मोक्का कायद्यांतर्गत कारवाई तील आरोपी नाना गायकवाड सध्या येरवडा कारागृहात असून एका कैद्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे. शुक्रवारी (दि.३) सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्रं.१ समोर घडली आहे.
सुरेश बळीराम दयाळु असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्र. १ आणि १२ येथे कैदी साफसफाई करत होते. त्यावेळी नाना गायकवाड हे खोली क्र.१ समोर बसले होते. त्यावळी आरोपी सुरेश दयाळु याने फिर्यादी यांच्या पाठिमागून आला. त्याने पोलिसांची नजर चुकवुन लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने नाना गायकवाड यांच्या उजव्या गालावर वार केला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तर जखमी नाना गायकवाड यांना कारगृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरेश दयाळु याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.