पुणे ग्रामीण,दि.३०:- चांदगुडेवाडी (ता. बारामती ) ग्रामपंचायत हददीत धरणवस्ती येथे कन्हा नदीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत लाखो रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाळू माफियांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे यांना स.पो.नि राहुल गावडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे चांदगुडेवाडी ता. बारामती, गावचे हददीत धरणवस्ती येथे कन्हा नदीपात्रात बेकायदा बिगरपरवाना कन्हा नदीमध्ये चोरून वाळु उत्खनन करून चोरून नेत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस स्टाफ व पंच असे दोन खाजगी वाहनाने मिळाले बातमीचे ठिकाणी
रविवारी (ता.२९) एक वाजण्याच्या सुमारास गेले असता तेथे एक लाल रंगाचा ट्रक मिळुन आला.सदर ट्रकवरील चालकास ट्रकमधील वाळुबाबत विचारणा केली असता, त्याने सदरची वाळु हि तुषार दत्तात्रय चांदगुडे व त्यांचे दोन भागीदार यांचेकडुन भरून आणले बाबत पोलिसांना सांगीतले. तसेच सदर ठिकाणी दोन जे.सी.बी तेथील दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळु उत्खनन करून चोरून भरत असताना व दोन ट्रॅक्टर डंपींग ट्रॉलीसह मिळुन आले. पोलीसांची चाहुल लागताच एक जेसीबी चालक अंधाराच फायदा घेवुन पळून गेला व त्याचे इतर तिन साथीदार लाल रंगाचे चारचाकी वाहनामध्ये बसून पळून गेले. त्यानंतर जागीच मिळून आलेल्या लोकांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यानी त्यांची नावे १) मनोहर शामराव चांदगुडे, वय ४६ वर्षे, रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी बारामती,२) स्वप्नील ज्ञानेष्वर भोंडवे, वय २७ वर्षे, रा. आंबी खु।।, ता. बारामती, ३) विठठल तानाजी जाधव, वय २५ वर्षे, रा. आंबी खु।।, ता. बारामती, येथील ४) अमोल शंकर सणस, वय ४६ वर्षे, रा. उरुळीकांचन, ५) महादेव बाळु ढोले, वय ३८ वर्षे, रा. मोरगाव चौयथाळवस्ती,बारामती, असे असल्याचे सांगीतले.
असा एकूण ४७ लाख ७० हजार रूपये किंमतीचा जेसीबी मशीन, ट्रक व ट्रॅक्टर डंपीग ट्रॉलीसह जप्त करण्यात आलेले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..
सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग बारामती, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. राहुल गावडे, सहा फौज कारंडे, सहा. फौज कोकरे, सचिन घाडगे, पो.हवा विजय कांचन, पो. हवा एकशिंग, पो.हवा अहिवळे, पो. हवा नवले तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई शेलार, पो. कॉ.नाळे, पो.का.जैनक यांनी वाळू माफियांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.