पुणे,दि.२७:- पुणे शहर परिसरातील औद्योगिक कंपन्या आयटी कंपन्या तसेच व्यापारी यांना माथाडी किंवा माथाडीच्या नावाखाली कोणी त्रास असेल किंवा कोणताही गुन्हेगार खंडणी मागत असेल देऊ नये व खंडणी मागत असेल व त्याची तक्रारार कराल तर अशांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असे पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले. तसेच औद्योगिक कंपन्या, व्यापारी, आयटी कंपन्यांनी अनधिकृत माथाडी किंवा माथाडीच्या नावाखाली व कोणत्याही गुन्हेगार त्रास देणाऱ्या लोकांची तक्रार न घाबरता करावी असेही आवाहन त्यांनी केले.मंगळवारी (दि.24) सायंकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे आयुक्तालय हद्दीतील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायीक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त रितेश कुमार बोलत होते. यावेळी विविध संघटनांचे १०० पेक्षा हि जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, माथाडी कामगारांच्या मजुरीचे दर ठरवावेत, वाहतूक समस्येबाबत योग्य त्या उपाय योजना कराव्यात यासंदर्भात मागण्या करण्यात आल्या.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, सर्वांच्या सूचना संबंधित पोलीस उपायुक्त परिमंडळ, पोलीस स्टेशनला कळवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच तक्रारदारांनी न घाबरता आपल्या तक्रारी द्याव्यात.सदर बैठकीस.पुणे शहर पोलीस आयुक्त , रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त. संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त विशेष शाखा आर. राजा, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे),अमोल झेंडे,पोलीस उप आयुक्त (वाहतुक ) विजय मगर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा, पोलीस उपआयुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, परिमंडळ ५ उपआयुक्त परिमंडळ. विक्रांत देशमुख, परिमंडळ ४ उपआयुक्त परिमंडळ. शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त विशेष शाखा,राजेंद्र साळुंके पोलीस निरीक्षक. मानकर खंडणी विरोधी पथक, पोलीस निरीक्षक. वाघमारे खंडणी विरोधी पथक, राजेश मते, निरीक्षक माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ, पुणे, व्यापारी संघटना व असोशिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, कपंन्याचे पदाधिकारी उपस्थित होते. सहा. पोलीस आयुक्त विशेष शाखा, राजेंद्र साळुंके यांनी बैठकीचे सुञ संचालन केले व आभारप्रदर्शन केले.