पुणे,दि.२६:- प्रजासत्ताक दिन निमित्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड यांनी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे दि.२६ रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होत,
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. संचलिका. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे. फाउंडेशन. सौ.संगीता अभिजीत पन्हाळे, व उद्घाटक पुणे महापालिका नगरसेवक.पृथ्वीराज शशिकांत सुतार उपस्थित होते,
दरवर्षीप्रमाणे तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ व वर्षभर विविध
कार्यक्रमाचे तेली समाजाच्या वतीने कोथरूड येथे तेली समाजातील श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सदाशिव भोज, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येते.
व श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड.यांच्या वतीने मनोहरपंत महिपतराव डाके यांनी गेले 24 ते 25 वर्षे पासून वधू-वरांची लग्न जमवण्यासाठी समाजामध्ये काम करत आहे व प्रजासत्ताक दिन निमित्त पुण्यातील तेली समाजाच्या श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने श्री संताजी प्रतिष्ठान गौरव पुरस्कार डाके यांना सन्मानित करण्यात आला आहे.
व होम मिनिस्टर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त तेली समाजातील महिलांनी हळदी कुंकू निमित्त आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलानुसार दिसते तसेच वैचारिक / बौद्धिक देवाण घेवाण होते म्हणून हा सण आपण साजरा करतो.
हळदी कुंकू हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे, कुंकुम तिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुध्दी पूजेचे अधिष्ठान आहे.यावेळी प्रमिला किरवे, सोनाली उमेश किरवे, मंगला जाधव, उज्वला पिंगळे, अश्विनी जाधव, अर्चना दीपक खोंड, गौरी गणेश पिंगळे, अश्विनी स्वप्नील माकुर्डे, नंदा रोहित उबाळे, राखी संतोष माकुर्डे, अर्चना सुरेंद्र दळवी, अरुणा पंडित पिंगळे, संगीता रोहित दास हाडके, निवेदक अभिनेता बाळकृष्ण नेरकर व पुण्यातील तेली समाजातील वेगवेगळ्या संस्था व संघटनेचे पद अधिकारी व कार्यकर्ते वधु वर व पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.