पुणे,दि.१९ :- महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच रविवार, दि १४ जानेवारी,२०२३ रोजी महिलांशी अश्लील प्रकार केल्याचे संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस उपायुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी अश्लील प्रकार केल्याचे संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहे. त्यामुळे ढुमे यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
डॉ. नीलम गोऱहे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ढुमे यांनी संभाजीनगरमध्ये एका गाडीत एका ओळखीच्या महिलेशी अश्लील चाळे केले आणि घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली आहे. त्या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार यापूर्वीदेखील केले आहेत. यासंदर्भात नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कार्यालयीन चौकशी देखील लावली होती. याचदरम्यान ढुमे यांची बदली संभाजीनगर येथे झाली होती.व या निवेदनात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर देखील कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत. ज्या परिसरात उशिरापर्यंत हॉटेल सुरू असताना सुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही. अशा संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस व कामगार विभाग तसेच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्यावर कारवाई देखील करण्याची सूचना सदरील पत्राच्या माध्यमातून डॉ. गोर्हे यांनी केली आहे.