मुंबई दि१८:-शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. दोन्ही पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आता २०१९ आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेसाठी शिवसेनेने भाजप . लोकसभेसाठी शिवसेना २३ जागांवर लढेल तर भाजप २५ जगांवर लढेल. तर विधानसभेसाठी ५०-५० ( १४४-१४४ ) फॉर्म्युला ठरला आहे.
जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर मुख्यमत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकाच गाडीतून संयुक्त पत्रकार परिषदेसाठी बाहेर पडले. सर्वांच्याच बॉडी लँग्वेजवरुन विशेषतः उद्धव ठाकरेंच्या बॉडी लँग्वेजवरुन शिवसेनेला हवी तशी युती झाल्याचे संकेत मिळत होते. अखेर ही युतीची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केली.
पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांनी काही मुद्यांवर दोघांमध्ये मतभेद झाले. पण, दोघांमधील हिंदूत्वाचा समान दुवा असल्याने एकत्र आलो. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही होती. त्यामुळे भाजपने पीकविम्याची प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याची घोषणा केली. या प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वांनी कंबर कसली आहे. युतीवरुन शिवसेना आणि भाजप पक्षात असणारा वाद सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपात युतीवरुन असणारे मतभेद दूर झाले. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमवारी (ता.१८) शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. ती आटपून अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले. शहांबरोबर मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, प्रकाश जावेडकर, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार असे भाजपचे जम्बो पथक मातोश्रीवर दाखल झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तर विधानसभेत शिवसेना ६३ आणि भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.
हे दोन पक्ष आता एकत्र येत प्रचार करणार आहेत.