पुणे,दि.१०:- पुणे शहरात काही परिसरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत करण्याचे प्रयत्न करण्याचे प्रकार वाढत असल्याने कोयता हे हत्यार कुप्रसिद्ध झाले आहे. गुन्हेगारां नी कोयत्याचा वापर करू नये धडक कारवाई करत पोलिसांनी कोयते विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. पुण्यातील भोरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून. दुकानातून विक्रीसाठी ठेवलेले १०५ कोयते जप्त केले.
भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले, तरुण कोयत्याचा वापर करुन दहशत निर्माण करीत आहेत. भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी कोयत्याने येणार्या जाणार्यांवर वार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयता हे प्रमुख हत्यार म्हणून वापर होताना दिसते आहे. व गुन्हेगारांच्या हाती कोयते लागू नये,
म्हणून त्याची विक्री करणार्या दुकानावर छापा टाकून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.