नागपूर,दि.२०:- पुणे परिसरातील काही ठिकाणी व इतर जिल्ह्यांतील वाढत्या कोयता गँगच्या दहशतीविरोधात आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावादरम्यान अजित पवारांनी राज्याच कोयता गँगची दहशत वाढत असल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा, गँगमधील गुंडांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली आहे.कोयता गँग नेमकी आहे काय? अजित पवारांनी सभागृहात दिली माहिती राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, येथे कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे, या गँगकडून काचा फोडून, दहशत निर्माण केली जात आहे, महिलांना वेगळ्या पद्धतीने दमडाटी केली जात आहेत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडत आहेत. हे सातत्याने महाराष्ट्राच्या विशेषत: शहरी भागात मोठ्याप्रमाणात होत आहे. याप्रकरणी काही मुलं पकडली गेली आहेत. यातील सर्वाधिक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ही मुलं सोशल मीडियावर नाही तर काही टिव्ही सिरीयल बघून दारू पिऊन अशाप्रकारे गोंधळ घालतात आहे,अशी माहिती अजित पवार यांनी विधानसभेत केली. त्यामुळे सरकारने कोयता गँगची दहशत रोखण्यासाठी आवश्यकती पावलं उचलण्याची विनंती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला केली आहे.पोलीस दलाच्या मोठ्याप्रमाणात बदल्या केल्या गेल्या तो सरकारचा अधिकार आहे. परंतु त्या कुठेही शहरात कोयता गँगचे प्रकार होता कामा नये सुचना द्या तसेच कोयता गँगमधील गुंडावर मकोका लावा, तडीपाराची कडक कारवाई करा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. हे कोयता गँगमधील कोणत्याही पक्षाचे नसतात, त्यांना पक्ष वैगरे नाही तर फक्त दहशत निर्माण करण हा त्यांचा उद्देश आहे, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त सरकारने लावलाच पाहिजे अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.