महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भोर येथील खात्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपये लाच घेताना व्यवस्थापक व चालकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई भोर येथील एसटी आगारातील कक्षाच्या बाहेर सोमवारी (दि. 5) केली.भोर आगार व्यवस्थापक युवराज दिनकरराव कदम (वय 52), चालक विजय नामदेव राऊत (वय 51) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 49 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे.ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने आणि त्यांच्या पथकाने केली.