पुणे, दि. ३०: अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने कोंढवा येथील अरिफ वाहीद अन्सारी यांच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे १७ लाख १ हजार १८६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी केले आहे.