पुणे,दि.२३ :- पुण्यातील पाषाण येथिल एका चित्रकला शिक्षकांनी घरी चित्रकला शिकविण्यासाठी घरीआलेल्या चित्रकला शिक्षकाने 16 वर्षाच्या विद्यार्थीनीला हा डायलॉग ऐकविला अन तिला कामसुत्रचे फोटो दाखवून तिचा विनयभंग केल्याचा पाषाण परिसरात प्रकार समोर आला आहे.निलेश नानासाहेब पवार (वय ४९, रा. भगवतीनगर, सुतारवाडी रोड, पाषाण) असे या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या युवतीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ५०८/२२) दिली आहे. हा प्रकार पाषाण येथील फिर्यादीच्या स्टुडिओमध्ये १६ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेसहा ते साडे आठ वाजेच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा स्टुडिओ आहे.
त्याठिकाणी निलेश पवार हा त्यांना सायंकाळी चित्रकला शिकविण्यासाठी येत असतो.त्या स्टुडिओमध्ये एकट्याच असताना त्याने जॉनी राजकुमार यांचा तो लोकप्रिय डायलॉग म्हणून त्यांच्या पायाला स्पर्श करुन तुझे पाय किती मऊ व सुंदर आहेत, असे म्हणाला.त्यानंतर हाताला स्पर्श करुन तुझे हात किती सुंदर आहेत, असे म्हणाला.फिर्यादी या राधाकृष्णच्या पेटिंगमध्ये रंग भरत असताना त्याने स्टुडिओच्या दरवाजाला आतून कडी लावली.फिर्यादी यांना कामसुत्राचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये दाखवले. फिर्यादी यांना मिठीत घेऊन तू मला खूप आवडते,तू केस मोकळे सोडत जा, तू मोकळे केस असताना सुंदर दिसते.आज कालच्या मुलींना लग्न झालेल्या एक्सपिरियंन्स माणसाशी संबंध ठेवायला खूप आवडतात,
असे म्हणून त्यांना आय लव यू म्हणत फिर्यादीचे पायाला व गालाला चिमटा घेऊन त्यांच्या विनयभंग केला,असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.