पिंपरी चिंचवड,दि.२० :- पिंपरी चिंचवड हद्दीत मध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. व अवैध धंद्यावर छापेमारी केल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांनी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि 18 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अंतर्गत बदली केली आहे. गुन्हे शाखेने 3 दिवसांपूर्वी निगडी , वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली होती.निगडी, देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले होते. या कारवाईत 32 जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी झाली त्याच ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर देहूरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांची बावधन वाहतूक विभागात बदली केली आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव यांची देखील बावधन वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.याशिवाय वाकड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे , बाबाजान इनामदार, हवालदार दीपक साबळे , स्वप्नील खेतले, विंदू गिरी, प्रमोद कदम,विक्रांत चव्हाण, कातेय खराडे ,अतिक शेख, अजय फल्ले, तात्यासाहेब शिंदे,भास्कर भारती यांची तर देहूरोड पोलीस ठाण्यातील सामील प्रकाश ,सुनील यादव, सचिन सेजल, स्वप्नील साबळे,सुनील पवार या 18 जणांची बावधन वाहतूक शाखेत बदली केली आहे.