पुणे,दि.१७:-पुण्यातील औंध येथील “ द औंध सोशल फाऊंडेशन ”च्या वतीने केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी (राईफल शुटींग) स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान व शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम व विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणार्या खेळाडू तसेच विद्यार्थ्यांनाच देखील सन्मान द औंध सोशल फाऊंडेशन ”च्या वतीने करण्यात आला.सात खेळाडूना आर्थिक मदत व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रम दिनांक १७.११.२०२२ रोजी सकाळी ११.०० वा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला. होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष अभिजित सुभाषदादा गायकवाड, (आर्किटेक).व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश शहा ,कार्याध्यक्ष मित्र परिवार फाऊंडेशन आणि रक्त दाते, व आनंद बोराडे राष्ट्रीय खेळाडू व पंच हे होते. सौ.राधिकाताई गायकवाड वृक्षप्रेमी सौ.भाक्तीताई गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या व प्रभू पटेकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत्या.
या कार्यक्रमामध्ये सात खेळाडूना आर्थिक मदत व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. खेळाडू व पालक यांनी आपल्या मनोगतात अभिजीतदादांचे व संस्थेचे धन्यवाद व्यक्त केले. प्रमुख पाहुणे दिनेश शहा यांनी सर्व खेळाडूना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये अभिजितदादांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव शिरीष नाईकरे यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य अरविंद पाटील यांनी केले.
सूत्रसंचलन प्रदीप गोगटे व सचीन ओसवाल व आभार प्रदर्शन रो.सुनील सोनी यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ.हेमा परमार, डॉ. प्रेमचंद जैन, रो अल्का कोळी, स्नेहा श्रीखंडे, कृषीविश्व संपादक विलास श्रीखंडे, ट्रेजरर अरविंद जैन, रो जीतेंद्र ओसवाल, रो योगेश राठी, दिपचंद जैन जीतेंद्र परमार, सुशांत ठकेकर, रामदास घरत, सूर्याजी ठाणगे आदी उपस्थित होते.