पुणे,दि.१४:- झुंजार ऑनलाइन –पुणे शहरांतील मार्केट यार्ड येथील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करत दरोडा घातला होता व 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड शनिवारी (दि.12) दुपारी दरोडेखोरांनी लुटले होते व पसार झालेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने काही तासात पकडून त्यांना अटक केली होती. चोरट्यांकडून 11 लाख 18 हजार रुपयांची रोकड, सात मोबाईल, तीन दुचाकी, कोयता असा एकूण 13 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय-20, रा. मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय -28, रा. रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय -19, रा. राहुलनगर,
शिवणे), विशाल सतीश कसबे (वय-20, रा. मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय -23, रा. रामनगर, वारजे), गुरूजनसिंह सेवासिंह वीरक (वय -20, रा. शिवाजीनगर), निलेश बाळू गोठे (वय -20, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.मार्केट यार्ड येथील भुसार बाजार परिसरातील एका इमारतीत पी.एम. कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी आरोपींनी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवला. कर्मचाऱ्यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी जमिनीवर गोळीबार करुन कार्यालयातील 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटून पळून गेले.या गुन्ह्यातील आरोपींचा शोध पुणे शहर खंडणी विरोधी पथक घेत होते. त्यावेळी कुरिअर कंपनीत दरोडा गुप्ता आणि त्याच्या साथिदारांनी मिळून घातल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत देली.
आरोपी गुप्ता याच्या विरोधात वारजे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून तेव्हापासून तो फरार झाला होता. तर आरोपी मारणे याच्या विरोधात देखील मोक्का कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाईनंतर मारणे हा येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळवून तो कारागृहातून बाहेर आला होता. गुप्ता आणि मारणे हे सराईत गुन्हेगार आहेत.आरोपी गुप्ता, मारणे आणि साथीदारांची ओळख कारागृहात झाली होती. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात रोकड असते. त्यामुळे आरोपींनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याचा कट कारागृहात रचला होता, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दिली.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
पोलीस उप निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार यशवंत ओंबासे, मयूर तुपसौंदर,
सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.