आज शनिवार दि. १२ रोजी पुणे, पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये पिंपरी न्यायालायात विविध प्रकारचे 137 खटले निकाली काढण्यात आले त्यामध्ये 59,48,026/- रुपये महसूल जमा झाला व आकुर्डी येथील न्यायालयात येथे 680 खटले निकाली काढण्यात आले.त्यामध्ये 1,15,54,717/- रुपये महसूल जमा झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिनकर बारणे त्यांनी भूषवले.सदर कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे ,सचिव ॲड. निखिल बोडके ,सदस्य ॲड. मंगेश खराबे,अँड. ऐश्वर्या शिरसाठ यांनी केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.अध्यक्ष अँड विजय शिंदे यांची होती तसेच पिंपरी न्यायालयाचे माननीय न्यायाधीश मा. आर. एस. वानखेडे साहेब, मा.आर.एम.गिरी साहेब,मा. पी.सी. फटाले साहेब, मा.मोरे साहेब यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. लोकन्यायालय करिता पॅनल अँडव्होकेट म्हणून काम अँड.बिनी थॉमस,अँड प्रफुल्लता निगडे,अँड शुभा पिल्ले, अँड.आशा भामरे,अँड.गणेश कनकदंडे,अँड.मानसी उदासी
अँड.सुरेखा दफळ,अँड पूजा शिंदे यांनी पाहिले.यावेळी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांनी mediation training साठी ॲड अतिश लांडगे यांची निवड केल्याबद्दल पिंपरी न्यायालयातील न्यायाधिश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच सत्कारमूर्तीचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे व कमिटी यांनी पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊण सन्मान केला. माननीय न्यायधीश मोरे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना नागरीकांना लोकअदालत व त्याचे महत्व सांगितले व जास्तितजास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमा करिता पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. सुनील कडूसकर,सर्व सरकारी वकील तसेच पिंपरी बारचे बहुसंख्य वकील बंधू भगिनी व पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन सचिव.ॲड. निखिल बोडके यांनी केले. तर सर्वांचे आभार सदस्य ॲड. मंगेश खराबे यांनी मानले.