मुंबई,दि.०९:- शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गेल्या आठवड्यात निर्णय राखून ठेवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षी जुलैमध्ये उपनगरातील गोरेगाव येथील पत्रा चाळ (रो हाऊस) प्रकरणी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य राऊत यांना अटक केली होती. पत्रा चाळच्या पुनर्विकासात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचं समजतंय.