पुणे,दि.०८ :- पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे वारजे माळवाडी येथील अक्षय कॉलनीमध्ये सुरु असलेल्या ओम स्पावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून स्पा मॅनेजरला अटक केली आहे.
स्पा मॅनेजर संदीप संतोष तिवारी (वय २३) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आकाश प्रकाश साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखालीवेश्या व्यवसाय केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला.त्याने इशारा करताच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता.संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असुन, आरोपी स्पा मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे या पथकाने केली आहे.