पुणे,दि.०७:- पुण्यातील हडपसर परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेऊन 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.5) केली.
हडपसर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर कल्याण जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम 31,410 रुपये 70 हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 1 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 20 जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या 19 जणांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई सदरची कारवाई.पोलीस आयुक्त, पुणे शहर,अमिताभ गुप्ता. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, इरफान पठाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.