पुणे,दि.०६:- पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी 1) पो हवालदार प्रशांत जाधव 2)पो शिपाई अजित गायकवाड यांनी तक्रारदार यांचे आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करून ते 25 हजार रुपये घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध येथील ट्राफिक ऑफिस शेजारील सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही करावाई रविवारी (दि.6) करण्यात आली. याप्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्तता पाळली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली आहे.
संपूर्ण बातमी काही वेळातच