पुणे,दि.०७ :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, यावर्षीचा गणपती जोरदार आहे ना ! निर्बंधमुक्त गणपती उत्सव ! मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त मोठया उत्साहात, जल्लोषात, धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करीत आहेत. हे बघून फार आनंद होत असून समाधान वाटत आहे. तुम्हाच्या आयुष्यात चांगले दिवस येवो, सुख-समृद्धीचे , भरभराटीचे दिवस येवोत. या राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले.