मुंबई,दि.२६:-मुंबई मधील माथाडी कामगारांच्या कामगार मंत्रालयाशी निगडित विभागांशी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या माथाडी कामगारांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींचे निरसन होत नाही आहे. माथाडी कायद्याचा भंग करून होणारा आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करणे तसेच नवीन कामगार नोंदणी व इतर प्रक्रिया राबवण्यासाठी निरीक्षकाकडून वारंवार पैश्याची मागणी होत असल्याने कामगारांना नवीन निरीक्षक नेमून द्यावा, अशा प्रमुख मागण्या मुंबईतील माथाडी कामगार करत आहेत.
2009 च्या नियमावलीनुसार कामगार वाढ करायला दोन तृतीयांश कामगारांच्या सहमतीची गरज असते. तरीही 100 % कामगारांचा या कामगार वाढीविरोधात विरोध असताना 17 लोक आमच्यावर जबरदस्ती लादले गेले यातून थेट 100 लोकांना फरक पडत आहे. परिणामी कामागारांचं यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील कंत्राटदार आणि राजकारण्यांच्या संगनमतामुळे काहीच कारवाई होत नाही आहे, अशा समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे असं माथाडी कामगारांचं म्हणणं आहे.