बुलढाणा,दि.२०:- बुलढाणा काही परीसरात वाढत्या अवैध धंद्यामुळे दादागिरीचा जोर प्रचंड वाढला आहे..बुलढाणा शहर हे क्राईमकडे वळताना दिसत आहे. छोट छोट्या कारणावरून शहरात वाद होत आहे.. काल रात्री साडेनऊ दरम्यान दोन गटात तुफान जीवघेणी हाणामारी झाली. हा हाणामारीत एकाच गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे.बुलडाणा शहरातील गजानन टॉकीज जवळ ही घटना घडली आहे. गजानन टॉकीज जवळील महावीर किराणा दुकानमालक अग्रवाल यांचे कुख्यात गुंड समाधान मोरे याच्या नातवाईकांशी पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता.यावेळी हा वाद सोडविण्यासाठी संतोष पाटील यांनी मध्यस्थी केली. परंतू समाधान मोरे आणि त्याचा भाचा रितेश आणि त्याच्या साथीदारांनी संतोष पाटील यांना बेदम मारले. ही बातमी कळताच संतोष पाटील यांचा मुलगा तुषार हा त्याचा मित्र सनी पवार तिथे आले. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी सनी पवार यांचे वडील संजू पवार हे तिथेच असल्याने मुलाला वाचविण्यासाठी ते मध्ये पडले. मात्र त्याच वेळी समाधान मोरे गटाकडून चाकूहल्ल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तुषार पाटील यांच्या पोटात चाकू खुपसल्याने त्याचे लिव्हर फाटल्याचे सांगण्यात येत आहे..तर संजू पवार यांच्या पोटातही चाकू खुपसण्यात आल्याने ते गंभीर जखमी झालेत.दोघांनाही तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे..तर सनी पवार याच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र रात्री बुलढाणा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन 2 आरोपींना पाठलाग करून देऊळगाव राजा तालुक्यात सिने स्टाईल ने अटक केली आहे.