मुंबई,दि.११:- राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले आहे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 ची घोषणा केली असून त्यात दोन हेक्टरी ऐवजी तीन हेक्टर मर्यादा वाढवली आहे, या निर्णयाच्या शेतकरी नेते एस बी पाटील यांनी स्वागत केले आहे. शासनाने केलेली ही घोषणा कागदावर न राहता प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी. जेणेकरून शेतकऱ्याला तात्काळ उभा राहायला मदत होईल. अतिवृष्टीच्या किंवा अवकाळी पावसाच्या मदती ज्या आहेत दोन दोन तीन
वर्षांनी येतात, शेतकऱ्यांच्या ज्यावेळी नुकसान झालेल्या असतात त्यावेळेस त्यांना मदत मिळत नाही. त्या संदर्भात शासनाने जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मदत होईल, असे मत शेतकरी नेते पाटील यांनी व्यक्त केले.