पुणे (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या बाप लेकीने सर्वात खोल म्हणजे तब्बल ८२ फूट खोल स्कूबा डायव्हिंग करून इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड केला आहे. ओवी सातपुते आणि तिचे वडील विनय सातपुते यांनी ही कामगिरी केली आहे.ओवीने अवघ्या बाराव्या वर्षी स्कूबा डायव्हिंग करून ती पहिली सर्वांत छोटी स्कूबा डायव्हिंग करणारी मुलगी बनली आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरील एक स्कूबा संदर्भात कार्यक्रम सुरू होता. तो कार्यक्रम सुरू असताना ओवीने बाबांना विचारले की आपण हे करू शकतो का? वडील म्हणाले का नाही? त्यानंतर या सर्व गोष्टींचा शोध सुरू झाला.स्कूबा डायव्हिंगसाठी काय करावं लागतं. त्याच प्रशिक्षण कुठे घेतलं जातं. मात्र, पुण्यातील एकाच ठिकाणी याबाबत प्रशिक्षण दिलं जातं म्हणून त्या ठिकाणी या बाप लेकीने स्कूबा बाबत प्राथमिक शिक्षण घेतले. विशेष गोष्ट म्हणजे दोघांनी एकाचवेळी परीक्षा दिली. त्यावेळी पहिल्यांदा अवघ्या बाराव्या वर्षी ओवी हिने २५ मीटर म्हणजे जवळपास ८२ फुटांपर्यंत खोल जात स्कुबा डायव्हिंग केले. दोघांनी हा रेकाॅर्ड दुबईतील एका भव्य तलावामध्ये केला आहे.
स्कूबा डायव्हिंगचे ओवी आणि तिच्या बाबांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी थायलंडमध्ये जाऊन स्कूबा डायव्हिंगची परीक्षा दिली. देशातील विविध भागात स्कूबा डायव्हिंग केली आहे. या आधी या बापलेकीच्या नावावर दोन भारतीय विक्रम आहेत. ते दोघे भारतातील पहिले एकत्र स्कूबा डायव्हिंग लायसन्स धारक आहेत. तेव्हा ओवी अवघ्या १२ वर्षांची होती. तसेच अॅडवेंचर स्पोर्ट्स मधे “WE CAN IF U WILL” या पुस्तकाचे ते भारतातील पहिले लेखक लेखिका आहेत. India Book of records ने देखील त्यांना सन्मान दिले होते.
पुण्यातील ओवीने तिच्या वडिलांसह थायलंड येथील समुद्रात स्कूबा डायव्हिंगचा अभ्यासक्रम तसेच परीक्षेसाठी १८ मीटर खोलीपर्यंत स्कूबा डायव्हिंग केले होते. त्यानंतर या दोघांनी ओवीच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त स्कूबा डायव्हिंगचा रोमांचक अनुभव अनुभवला. ओवी आणि विनय सातपुते यांनी जवळपास प्रत्येकी २२ डाईव्हमधून एकूण २२ डायव्हिंग केले आहे. दुबईतील ह्या भव्य तलावामध्ये डाईव्ह करणारे आम्ही पहिलेच पिता-पुत्री आहोत असा अर्ज ‘INDIA BOOK OF RECORDS’कडे केला आहे, असं विनय सातपुतेंनी सांगितलं.