पुणे,दि.१२ : – खडकवासला धरणातून आज ( ता . १२ ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ११ हजार ९ ०० क्युसेक पाणी सोडले असून चार दरवाजे पाऊणे दोन फुटाने १२७१ क्यूसेकने , तर सात दरवाजे एक फुटाने ८५६ क्यूसेकने पाणी सोडले असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली . त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे . नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे पाटील यांनी केले आहे . मागील तीन दिवस खडकवासला
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे . परिणामी खडकवासला धरणातील उपयुक्त पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली . खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून आज दुपारी १ वाजता ११ हजार ९ ०० क्युसेक करण्यात येत आहे . धरण १०० टक्के भरल्याने धरणातून ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले . पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढवण्यात येईल . पाऊस कमी झाल्यास विसर्ग कमी करण्यात येणार आहे . असेही पाटील यांनी यावेळी सांगितले