पुणे, दि.०७:- गॅस सिलेंडर नंतर आता अन्नधान्य व डेयरी उत्पादनावर आता पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
या आधीच गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने आधीच सर्वसामान्य जनता महागाईने होरपाळलेली आहे आता पुन्हा आम जनतेला या जीएसटीचा फटका बसणार आहे. व सर्वसामान्य गृहिणींचं आर्थिक गणित कोलमाडणर आहे. अन्नधान्य व डेयरी डेरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय कौन्सिलने बैठकीत घेण्यात आला आहे.व तशी शिफारस करण्यात आली आहे. ही दरवाढ 18 जुलै नंतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने घेतला आहे.