पुणे,दि.२७:- पुणे शहरातील लोणीकाळभोर येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार लाख 78 हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा जप्त करण्यात आलाय.लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश रमेश बेले (वय 24) आणि कुमार अनिल नितळे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व कर्मचारी हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि कदमवाक वस्ती परिसरात दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता एका पिशवीत 20 किलो दोनशे ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.सदरची कामगिरी. पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त , पुणे शहर , संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , श्रीनिवास घाडगे , सहा.पो. आयुक्त , गुन्हे गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा पथकातील पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , सहा . पो . निरी . लक्ष्मण ढेंगळे , पोलीस अंमलदार मारुती पारधी , पाडुरंग पवार , राहुल जोशी , प्रविण उत्तेकर , मनोज साळुंके , संदिप शिर्के , संदिप जाधव , विशाल शिंदे , योगेश मोहिते यांनी केली आहे .