पुणे,दि.२१ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पुण्यातील कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स च्या हिरवळीवर
*Yoga For* *Humanity* *मानवतेसाठी योग* ही संकल्पना घेऊन कर्वेनगर येथील वेदान्त सांस्कृतिक मंच व संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने *योग महोत्सव* चे ( दि २१) सुंदर आयोजन करण्यात आले होते.
” योग हा कोणत्याही धर्माशी निगडित नाही तर स्व-कल्याणाचे ते एक श्रेष्ठ विज्ञान आहे.योग साधनेस जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून भारताने जगाला दिलेली ती एक देणगीच आहे.योगासनामुळे आयुष्यात
सकारात्मक बदल झाले आहेत.मोबाईल प्रमाणे शरीरालाही व्यायामाचे चार्जिंग आवश्यक असून प्रत्येकाने व्यायामासाठी दररोज वेळ काढलाच पाहिजे” असे प्रतिपादन आचार्य केदारनाथ पारगावकर यांनी केले.
सकाळी साडे सहा ते साडे आठ ह्या वेळेत योग प्रात्यक्षिके,शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार,व प्राणायाम करून घेण्यात आले.योग शिक्षक मनाली देव यांनी कलात्मक योग सादर केले.विनायक मुसळे व अलका जाधव यांनी आयुष मंत्रालय पुरस्कृत आसने करवून घेतली.मनोज साळी यांनी शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार चा सराव करून घेतला.आचार्य केदारनाथ पारगावकर यांनी योग शास्त्र चे महत्व विशद केले.
वेदान्त सांस्कृतिक मंचचे विनायक बेहेरे यांनी प्रास्ताविक केले व योग उपक्रमाची माहिती दिली.यावेळी देशविदेशात योग विद्येत विशेष प्राविण्य मिळवलेले व सन्मान बक्षिसे प्राप्त केलेले योगशिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.संकल्प प्रतिष्ठान तर्फे योग शिक्षकांचा सूर्योपासना पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री धुपकर ह्यांनी केले.सतीश आठवले यांनी उपस्थित नागरिक व योग साधकांचे आभार मानले.विश्व कल्याण मंत्र व शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास माजी नगरसेवक सुशील मेंगडे,वृषाली चौधरी,राजाभाऊ बराटे,शिवराम भाऊ मेंगडे,उपस्थित होते.युवक वर्ग व महिला मोठ्या उत्साहात स्वतःची योग मॅट घेऊन आल्या होत्या. वेदान्त सांस्कृतिक मंच ने तयार केलेल्या कलात्मक योग सेल्फी पॉईंट वर तरुण तरुणी बरोबरच जेष्ट नागरिकांनी फोटो काढून घेतले.ह्या कार्यक्रमात ३०० नागरिकांनी सहभाग नोंदविला.