पुणे,दि.२०:- आजपासून पालखी सोहळ्याला सुरवात होत आहे, संत तुकाराम महाराजांची पालखी आज मार्गस्थ झाली आहे तर उद्या आळंदीमधून माऊलींची पालखी निघणार आहे.
आणि 22 आणि 23 रोजी पालख्या पुणे शहर मुक्कामी असणार आहेत. त्याच अनुषंगाने पुणे शहर पोलिसांनीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसलेली पाहायला मिळतं आहे. पालखीच्या पार्श्वभूमीवर शहरात जवळपास 4 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर पुणे पोलीस पहिल्यांदाच वारी सोहळ्यात ड्रोनचादेखील वापर करणार आहेत, यावेळी वारकऱ्यांना आणि सामान्य लोकांनासुद्धा पालखीचं लाईव्ह ट्रेकिंग करता येणार आहे.
वारकऱ्यांना आणि सामान्य लोकांनासुद्धा पालखीचं लाईव्ह ट्रेकिंग करता यावे त्यासाठी हे संकेत स्थळ पुणे पोलिसांकडून लाईव्ह करण्यात आलं असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.