पुणे,दि.१४:-पुण्यातील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विकास आणि परंपरा या दोन्ही गोष्टी एकत्रित पुढे गेल्या पाहिजे. भाषणाला सुरुवात करताना मोदी म्हणाले की, भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो.आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचे सौभाग्य लाभले असून, हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे. देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. असे म्हणत येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचे रुप असल्याचे मोदी म्हणाले.यावेळी मोदी म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे 725 वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केले असून, भारताला गतीशील ठेवले असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते तुकाराम महाराजांचे अभंग तुरुंगात म्हणत असे यावेळी मोदींनी सांगितली.
भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला लागभल्याचे सांगत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.