पिंपरी-चिंचवड,दि.०८:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर काल (मंगळवारी) मोठी कारवाई करण्यात आली. चऱ्होली, रावेत, वाकड भागात कारवाई करण्यात आली.ही कारवाई पुढेही सुरु राहणार असल्याचे उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितले.
‘ब’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत बीआरटीरोड रावेत येथील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई करण्यात आले. 44 पत्राशेड, 8 वीट बांधकाम असे अंदाजे 1 लाख 93 हजार 950 चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 च-ऱ्होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील नियोजित 45 मीटर रुंद रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आले. पत्राशेड, वीट बांधकाम, आरसीसी अशी 58 बांधकामे पाडण्यात ईआली. अंदाजे क्षेत्रफळ 48 हजार 514 चौरस फुट अनधिकृत बांधकामावार कारवाई करण्यात आली.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक 26 वाकड स्मशानभूमी ते सुखवानी पेट्रोल पंप, बंगळुरु हायवे, वाकड व ताथवडे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईत 54 पत्राशेड पाडले. अंदाजे 1 लाख 88 हजार चौरस फुट बांधकाम पाडले.