जळगाव,दि.०७ :-जळगाव येथील मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील हाॅटेल रावसाहेबच्या मागील बाजुस सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर आज मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास पोलीसांनी अचानक धाड टाकली.या कारवाईत १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, या कारवाईमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस नाईक विकास मुकुंदा नायसे यांनी फिर्याद दिली. यानुसार तालुक्यातील पुरनाड फाट्यावर हाॅटेल रावसाहेब च्या मागे जितेंद्र सुभाष पाटील (रा.विटवा,ता रावेर) यांनी आपल्या हाॅलमध्ये जुगार अड्डा चालविण्याच्या कारणावरून त्यांच्यासह इतर १४ जणांवर महाराष्ट्र जुगार ऍक्टमधील कलम ४ आणि ५ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन १४ संशयतींना अटक करण्यात आली.
संजय गजमल मराठे (वय ३९ रा.पुरनाड), गजानन भिमराव सोनवणे (वय५९ रा मुक्ताईनगर), संतोष नत्थु खुरपडे (वय ३३ रा मुक्ताईनगर),कैलास वासुदेव जाधव (वय ३८ रा वडोदा), विजय नारायण पगरमोर (वय ४२ रा शेगाव जि बुलढाणा),मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहीर (वय ३७ रा शेगाव ), रविंद्र सदाशिव शिरोडकर (वय ४५ रा वडोदा), मोहम्मद मोहसिन खान (वय ४० रा शेगाव), गजानन मनोहर शंखे (वय ४० रा शेगाव), महादेव धनसिंग राठोड (वय ४१ रा कान्हेरी गवळी,ता बाळापुर जि अकोला), अनिल नामदेव कोळी (वय ५२ रा टहाकळी), राजेश सिताराम वाकोडे (वय ५० रा नांदुरा), सुरेश रामदास लोखंडे (वय २९ रा वडोदा),सिताराम प्रल्हाद पारसकर (वय ५२ रा भोटा) या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जुगार खेळणाऱ्यांजवळ १ लाख ७० हजार २२० रुपयांच्या रोकडसह तीन चारचाकी, दोन दुचाकी, १३ स्मार्टफोन, पत्त्याच्या कॅटसह अन्य सामुग्री जप्त करण्यात आली.याची एकुण मुल्य १३ लाख ५२ हजार २२० रुपये आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे. दरम्यान या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.