पुणे,दि.१७ :- राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेचा मार्ग मोकळा झालाय.आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली. डेक्कन नदी पात्रात होणार सभा होणार आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर महत्वाचा पुणे दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंची पुण्यात सभा 21 मे या दिवशी होणार आहे. डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. राज ठाकरे यांना पुण्यात सभेसाठी परवानगी देण्यात आलीय. पुणे श पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा फायनल झाली आहे. डेक्कन नदी पत्रात आता सभा होणार आहे. आधी सभेसाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, जागेत बदल करण्यात आला आहे. मनसेने डेक्कन पोलिसांना पत्र दिले आहे. 15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते. काल येथील जागेची पाहणी करण्यात आली. आता परवानगी मिळाल्याने नदी पत्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.