पुणे ग्रामीण,दि.१४ :- लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी दोन लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक चांगलेच गोत्यात आले आहेत.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी व्यक्ती आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकास ताब्यात घेतलं आहे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी व्यक्ती आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकास ताब्यात घेतलं आहे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पीआय आणि एएसआयवर अॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस (50), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान (52) आणि यासीन कासम शेख (58) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय खान आणि यासीन शेख याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी एएसआय खान याने तक्रारदाराकडे 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडीअंती दीड लाख रूपये ठरले. लाच घेण्यास पोलिस निरीक्षक मोरे यांनी एएसआय यांना प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी रात्री ट्रॅप मध्ये यासन शेख हा दीड लाख रूपये घेताना सापडला. त्यामुळे सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार
पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, एएसआय मुश्ताक खान,
पोलिस कर्मचारी अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे, दामोदर जाधव आणि चालक चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.