पुणे दि ४ :- पुणे ग्रामीण भागातील ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील असलेल्या २ गुन्हेगार,दि, ३ रोजी १) मयुर जयसिंग गायकवाड वय २४ रा, राजगुरुनगर पुणे व २)अमर बाळासाहेब शेवाळे मंचर पुणे हे आरोपी बालेवाडी परिसरात जवळ गावठी कट्टे घेऊन फिरत आहेत अशी माहिती बातमी दारा मार्फत ,चतु:श्रृंगी पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमारे यांना मिळाली व तपास पथकासह बालेवाडी येथे मिटकॉन कॉलेज समोर जाऊन संशयित २ इसम यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व २काडतुस मिळाले व यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व २ गावठी कट्टे व २ काडतुस जप्त करण्यात आले आहे या कारवाईत , सुमारे ४५२०० रुपये किंमतीची १ लोखंडी कट्टा व १ सिक्सर १ काडतूस पोलिसांनी जप्त केली आहे व दोघांवर गुन्हा दाखल केला आहे हि कारवाई मध्ये अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ, प्रसाद अक्कानवरू परिमंडळ ४ पुणे शहर साहेब पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते खडकी विभाग पुणे शहर व चतु:श्रृंगी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे श्रीमती वैशाली गलांडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमारे कर्मचारी पोलीस हवालदार बाळासाहेब गायकवाड, पोलीस हवालदार एकनाथ जोशी, पोलीस ना, सारस साळवी,पोलीस.ना, प्रकाश आव्हाड,पोलीस.ना, दादा काळे ,संतोष जाधव पो.शि.तेजस चोपडा,ज्ञानेश्वर मुळे,पोलीस.ना.संजय वाघ,पोलीस.ना.अजय गायकवाड,पोलीस.ना.अमर शेख या टिमने आरोपी पकडले आहेत व पुढील तपास उप, निरीक्षक प्रेम वाघमारे करीत आहेत.