मुंबई,दि.१० :- सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी कंबर कसली आहे.17 मे रोजी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात निवडणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. नवी मुंबई.
वसई विरार, उल्हासनगर , कोल्हापूर , अकोला, अमरावती (Amravati), नागपूर,
सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली , मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात 17 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील,
असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणी दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक जारी केलं आहे.
आजच सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथं देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितले आहे.
आठवडाभरात आरक्षण जाहीर होणार
17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून आरक्षणाची सोडत काढली जाईल.
त्याच वेळी मतदार याद्या फोडून त्यावर हरकती सूचनांची कार्यवाही पुढील 10 दिवसांत होऊ शकते.
त्यामुळे जून मध्ये निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.