पुणे,दि.२० :- राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्यांचा समावेश आहे.अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली करण्यात आली आहे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे दरम्यान, अप्पर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले संदीप कर्णिक यांची पदोन्नतीवर पुणे शहरात सह पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश झाली आहे
अंकुश शिंदे यांची पिंपरी – चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.कृष्ण प्रकाश यांची पोलिस आयुक्त पिंपरी – चिंचवड येथून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांची पिंपरी – चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.