पुणे,दि.11 :- पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिका कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर १५ हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे.सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्यावर अॅन्टी करप्शनची कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील १ ) लोकसेवक सचिन चंद्रकांत तामखेडे , वय – ३४ वर्षे – पद- सहायक आयुक्त , वर्ग – २ २ ) अनंत रामभाऊ ठोक , वय ५२ वर्षे , कनिष्ठ अभियंता , वर्ग -३ ३ ) दत्तात्रय मुरलीधर किंडरे , वय – ४७ वर्षे , शिपाई , वर्ग – ४ सर्व नेमणूक कोथरूड क्षेत्रीय कार्यालय , पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्यासह इतर दोघांविरूध्द लाच प्रकरणी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. 15 हजार रूपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन तामखेडे हे दोन वर्षांपुर्वी प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत रूजू झाले होते. राज्य सरकारकडून त्यांनी प्रतिनियुक्ती घेतली होती. यापुर्वी त्यांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात देखील कामकाज पाहिले आहे. कोथरूड पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे . थोडक्यात माहिती : – यातील तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कोथरूड येथील ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणाच्या कामाचे बील मिळणेकरीता लोकसेवक सचिन तामखेडे यांना भेटले असता | त्यांनी २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती . सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बील मंजूर करून देण्याकरीता लोकसेवक सचिन तामखेडे यानी तडजोडीअंती १५ हजार रूपये लाचेची मागणी केली . त्या लाच मागणीस लोकसेवक अनंत ठोक यानी सहाय्य केले . आज रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लोकसेवक सचिन तामखेडे यांना भेटले असता त्यांनी लोकसेवक अनंत ठोक याचेकडे लाच रक्कम देण्यास सांगितले व लोकसेवक ठोक यानी कार्यालयातील शिपाई दत्तात्रय किंडरे याचेकडे देण्यास सांगीतले व किंडरे यानी १५ रूपयांची लाच | रक्कम स्वीकारल्यावर त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून कोथरूड पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे . ला . प्र . वि . पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे हे तपास करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र . वि . पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६४ सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .