नीरा नरसिंहपूर,दि.२५ :-पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सर्वधर्म समाभावाचे प्रतीक ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीरबाबा) हे आसल्यामुळे. दोन वर्षातील निर्बंध मुक्तीनंतर प्रथमच उरूस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला .
पिरसाहेब यात्रा कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पिरसाहेब बाबा यांच्या देवाच्या घोड्याची संपूर्ण गाव प्रदक्षणा पिरसाहेब यात्रा कमिटीच्या वतीने वाजत-गाजत करण्यात आली. हजारोच्या संख्येने भाविक भक्त एकत्र येऊन आपापले नवस पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. दिनांक 24 रोजी पिरसाहेब बाबांच्या यात्रेचा दुसरा दिवस झाल्याने रात्री दहा वाजता भाविकां च्या मनोरंजना साठी तमाशा साजरा करण्यात आला. यात्रेकरूंनी ही याचा आनंद घेतला. यात्रेत अनेक खेळणी पाळणे मिठाईची दुकाने शेकडो या ठिकाणी आलेले आहेत. आनेक ठिकाणाहून बाबांच्या दर्शनासाठी भाविक भक्त हजर होऊन आपली मनोकामना पूर्ण करीत आसतात. पिंपरी बुद्रुक येथील सर्वच तरुण प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते व पिरसाहेब यात्रा कमिटी
पिंपरी बुद्रुक पिरसाहेब बाबांची संपूर्ण गाव प्रदक्षणा करीत आसताना,, पिरसाहेब बाबा की जय, उदगीर साहेब बाबा की जय, राजवल साहेब बाबा की जय, आसा पिरसाहेब बाबांचा नाम उल्लेख करून भाविक भक्त मोठ्या आनंदाने घोषणा करीत होते .
सर्वच भाविक भक्तांचे ग्रामपंचायत व पिरसाहेब यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्यामुळे आलेले भाविक भक्त आनंद व्यक्त करीत होते. या यात्रे निमित्त बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी या ठिकाणी आपली हजेरी लावून आलेल्या भाविकांसाठी यात्रे निमित्त नियमाचे पालन करण्याच्या सूचना भाविक भक्तांसाठी देण्यात आल्या. पिरसाहेब बाबांचा ऊरूस यात्रा कमिटीने मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेला आसून. याबद्दल सर्व भाविक भक्तांनी आनंद व्यक्त केला.
आनेक भाविक भक्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी अनेक जिल्ह्यातून ठिकाणाहून आलेले आसून सर्वच भाविक यात्रेचा आनंद घेत आहेत. शेवटी आज दिनांक 25 रोजी कुस्त्या होऊन पिरसाहेब बाबांची प्रार्थना झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार