पुणे,दि.२४ :- शिरूर येथ आईचे वैद्यकीय बील मंजूर करण्यासाठी 9 हजार रुपये लाच घेताना उप कोषागार कार्यालयातील उप कोषागाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.रमेश काशिनाथ घोडे (वय – 47) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप कोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई गुरुवारी (दि.24) केली आहे.याबाबत 32 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे वडील शासकीय नोकर असून तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय उपचाराचे बिल उप कोषागार कार्यालय शिरूर येथे मंजूरी करीता दिले होते. तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी घोडे याने तक्रारदार यांच्याकडे बिलाच्या 10 टक्के 29 हजार रुपये लाच मागितली.पुणे एसीबीने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी आरोपीने 10 हजार लाचेची मागणी करुन 9 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रमेश घोडे याला रंगेहाथ पकडले. आरोपी रमेश घोडे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडेअपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री राजेश बनसोडे , ला.प्र . वि . पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र . वि . पुणे व. सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र . वि . पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालया क्रमांकावर सपंर्क १०६४ साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले