रायगड,दि.०९ : – रायगड जिल्हात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करू नका, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी विनामास्क केसेस बंद करण्याचे आदेश काढले आहेत.या आदेशाच्या अनुषंगाने आता रायगड पोलीस हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई केसेस करू नका असे पत्र सर्व पोलीस ठाण्यात आणि वाहतूक शाखांना दिले आहे.
मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर लावणे, गर्दी टाळणे हे नियम बंधनकारक केले होते. करोना प्रादुर्भाव असल्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केसेस होऊ लागल्या. त्यामुळे पकडणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे नागरिक मास्क लावूनच बाहेर पडत होते. करोनाचा प्रादुर्भाव हा रायगडात कमी झाला आहे. जिल्ह्यात लसीकरण प्रमाणही 92 टाक्याच्या वर असल्याने कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळ येथे मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र जारी केले आहे