निरा नरसिंहपुर,दि.०८ :-नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी इंदापूर तालुक्याचे विस्ताराधिकारी सुनीता कदम,नीरा नरसिंगपूर गावचे सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे, ग्रा. सदस्य रेणुका आनंद काकडे, अनघा कोळी,गौरी अमोल शिंदे या महिलांचे सत्कार व भाषणे झाली.
महिलांनी चूल आणि मूल एवढ्याच गोष्टी न संभाळता स्वतःच्या आरोग्याकडे तसेच शिक्षणाकडे आणि उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे गाव हा आपला परिवार आहे आणि सर्वांनी एकमेकांना मला मदत केली पाहिजे तसेच ज्या विधवा अपंग आणि निराधार महिला आहेत त्यांना आपण सर्वांनी एकत्र येऊन मदत केली पाहिजे आणि जर कोणाला कसलीही अडचण असेल तर अशा महिलांसाठी आपण एक ग्रामपंचायतीच्या बाहेर तक्रार पेटी लावून त्यांच्या अडचणी सोडवू असे मत स्वाती सिद्धार्थ सरवदे यांनी व्यक्त केले.
या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर सुमित्रा कोकाटे मॅडम आशा सेविका देवळे त्याच प्रमाणे गावातील माता आणि भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी विस्ताराधिकारी इंदापूर युनूस शेख, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, आनंद काकडे, मा. उपसरपंच नरहरी काळे, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ राऊत आणि ग्रामसेवक गणेश लंबाते उपस्थित होते.
निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे