पिंपरी चिंचवड,दि – जागतिक महिला दिनानिमित्त उद्या भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने पुण्यातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन दिली आहे.मेट्रोची पहिली सफर सकाळी साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.या सफरमध्ये शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके नगरसेवक/नगरसेविका प्रवास करणार आहेत. ज्या महिला मेट्रो प्रवासासाठी इच्छुक आहेत अशा सर्व महिलांना मंगळवार जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने संपुर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन दिली आहे.सकाळी साडेसात वाजता मेट्रोची पहिली सफर पिंपरी स्थानक ते फुगेवाडी ते परत पिंपरी अशी होणार आहे. यानंतर दर अर्ध्या तासांनी एक फेरी याप्रमाणे रात्री नऊ वाजेपर्यंत दिवसभर शहरातील महिलांना मोफत मेट्रो सफर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील सर्व फ्रंटलाईन महिला कर्मचारी व इतर जास्तीत जास्त महिलांनी मेट्रो सफरचा अनुभव घ्यावा असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.