नवी दिल्ली :- आता केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या सेट-टॉप बॉक्सचे कार्डही बदलता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच अशी यंत्रणा आणणार आहे. यामुळे जे ग्राहक आताच्या ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे.
डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सनी ट्रायच्या या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे ट्रायला नवीन प्रणाली लागू करण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक डीटीएच कंपनीचे सेट-टॉप बॉक्स वेगवेगळे आहेत. असा युक्तीवाद करत डीटीएच कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पण ट्रायने यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.अशी माहिती ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिली.