पुणे,दि.०४ :- पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे येत्या गुरुवारी (दि.10) पुण्यात येणार आहेत. मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर गेली. ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने नाकारले आहे. त्यामुळे कधीही महापालिका निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.चिखले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी व शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राजसाहेब ठाकरे पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या समोर, कमला क्रॉस बिल्डींगमधील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे