नीरा नरसिंगपूर,दि.०४ :- नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील श्री चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते महाविद्यालय तसेच श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नीरा नरसिंगपूर या दोन्ही महाविद्यालयांमध्ये आज कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने बारावीचे पेपरची सुरुवात झाली याप्रसंगी दोन्ही बोर्डांनी एकदम छान अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था त्याच प्रमाणे सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था अत्यंत छान पद्धतीने केली होती तसेच पोलीस स्टेशनचे पो. कॉ. सुहास सिकंदर आरणे तसेच पो. कॉ.एस. ए. गुंजाळ आणि पोलीस मित्र गायकवाड यांनी या महाविद्यालयांवर आज आपले कर्तव्य पार पाडले. याप्रसंगी चैतन्य विद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री श्रीकांत दंडवते, प्राचार्य. गोरख लोखंडे सर.प्रशांत सरवदे,अध्यक्ष.अभय वांकर सर इत्यादी उपस्थित होते आणि श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम वरती प्राचार्य श्री. रविराज काकडे सर, केंद्र उपसंचालक राजेंद्र मोहिते सर, बिल्डींग कंडक्टर अतुल, हावळे सर अविनाश शिंदे सर, आणि साठे सर इत्यादी उपस्थित होते.इंग्रजी विषयाचा पेपर हा अतिशय शिस्तबद्ध आणि छान वातावरणात विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.
निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे